राज्यात रविवारी कोरोनाच्या ६५५५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ८६ हजार ४० रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. तर ३६५८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या १ लाख ११ हजार ७४० झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८ टक्के एवढे आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात नोंद झालेले १५१ मृत्यू हे मुंबई मनपा-६९, ठाणे-१ ठाणे मनपा-३, कल्याण-डोंबिवली मनपा-८, भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर मनपा-१, वसई-विरार मनपा-४, नाशिक-२, धुळे-४,जळगाव-६,जळगाव मनपा-४, पुणे-३, पुणे मनपा-२०, पिंपरी-चिंचवड मनपा-८, सोलापूर मनपा-४, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-१० या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.