महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोना

बुधवार, 22 जुलै 2020 (09:18 IST)
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. दरम्यान, ते घरीच उपचार घेत आहेत. मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारनंतर सत्तार हे सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. याआधी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचादेखील कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आला होता. 
 
यापूर्वीही राज्यातील काही मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. काँग्रेस नेते अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, फौजिया खान यांनाही कोरोना झाला होता. काहींनी कोरोनावर मात केली असून काही नेते अजूनही उपचार घेत आहेत. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती