हा तरुण मुंबईतील एका कारखान्यात काम करत होता. लॉकडाऊनच्या काळात काम गेल्यानं बेरोजगार तरूण आपल्या गावी परतला होता. तो 4 दिवस क्वारंटाइन सेंटरमधून घरी देखील आला. त्यावेळी कुटुंबियांनी त्याचा विवाह करण्याचे निश्चित केले पण बाहेरुन गावात येणाऱ्या लोकांची प्रशासनाकडून कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीनंतर हा नवरदेव कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं.