भारतात दोन लसीवर मानवी चाचणीला परवानगी

बुधवार, 15 जुलै 2020 (09:04 IST)
भारतात कोरोनावर दोन लसी विकसित करण्यात आल्या असून मानवी चाचणीला देखील परवानगी दिली आहे, अशी माहिती आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिली आहे. विशेष म्हणजे उंदीर आणि संशयित अशा दोन्ही स्वदेशी लसींची टॉक्सिसिटी स्टडीज यशस्वी झाली आहे, असे देखील ते पुढे म्हणाले आहेत.
 
कोरोनावरील मानवी चाचणी घेण्यासाठी या महिन्यात आम्हाला परवानगी दिली गेली आहे. त्याप्रमाणे दोन्ही मानवी लसींच्या चाचणीसाठी तयारी करण्यात आली असून या दोन्ही लसींसाठी एक – एक हजार नागरिकांचा क्लिनिकल स्टडीही करण्यात येत आहे. विशेष म्हणजे जगभरात वापरण्यात येणाऱ्या लसींपैकी ६० टक्के लस या भारत बनवत आहे. हे संपूर्ण जगाला माहिती असून प्रत्येक देश भारताच्या संपर्कात देखील आहे.
 
भारतासह इतर देशही कोरोनावर लस बनववण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तर रशियानेही लस तयार केली असून पहिल्या टप्प्यात लस बनवण्यात रशियाला यश आले आहे. यासह चीननेही लस तयार करण्यासाठी कंबर कसली आहे. चीनमध्ये लसीवर वेगाने अभ्यास केला जात आहे. अमेरिकेतही दोन लसींवर वेगाने काम सुरू आहे. अमेरिकेने दोन लसींच्या प्रक्रियेला फास्टट्रॅकवर आणले आहे. ब्रिटनचेही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीवर वेगाने काम सुरू केले आहे. मानवासाठी लस बनवण्यासाठी तत्पर आहेत, असं भार्गव यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती