पीएसएम विभागाने ग्रामीणमधील १३ तालुक्यातील २ हजार तर महानगरपालिकेच्या १० झोनमधील २ हजार लोकांचे रक्तांचे नमुने घेऊन तपासले. यात प्राप्त माहितीनुसार, नागपूरच्या सहा विधानसभा क्षेत्रापैकी पूर्व नागपुरातील लोकांमध्ये अँटीबॉडीज वाढलेल्यांची संख्या अधिक असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. विशेषत: महानगरपालिकेच्या नेहरूनगर, आशीनगर, गांधीबाग व सतरंजीपुरा या भागातील दाट वस्त्यांमध्ये अँटीबॉडीज वाढलेले मोठ्या संख्येत लोक आढळून आले.
या सर्वेक्षणातून एक गोष्ट समोर आली आहे की, झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार होण्याचे प्रमाण सामान्य व पॉश वसाहती राहणाऱ्या लोकांपेक्षा तिप्पट आहे. शहरांमध्ये २००० लोकांमधून साधारण १००० लोकांमध्ये अँटीबॉडीज वाढले असल्याचे दिसून आले. यावरून यातील एकाही व्यक्तीला लक्षणे आढळून आली नसल्याने त्यांनी कोविडची तपासणी केली नाही.