कोरोना विलगीकरणाचा शिक्का, चौघांनी केला रेल्वेतून प्रवास

गुरूवार, 19 मार्च 2020 (09:45 IST)
मुंबईतून दिल्लीकडे जाणाऱ्या गरीबरथ ट्रेनमध्ये हातावर कोरोना विलगीकरणाचा शिक्का असलेल्या चौघा प्रवाशांना पाहून सहप्रवासी धास्तावले. तिकीट तपासणींनाही ही बाब समजताच त्यांनी या प्रवाशांना रेल्वेनं प्रवास करण्यास मज्जाव केला आणि पालघर इथं रेल्वे थांबवून चौघांनाही गाडीतून उतरवण्यात आलं.हे चौघेजण जर्मनीहून आले होते आणि सुरतकडे जात होते. विमानतळावर त्यांच्या हातावर शिक्के मारून त्यांना १४ दिवस घरी विलगीकरण करण्याची सूचना केली होती. पण ते रेल्वेनं सुरतला चालले होते. 
 
जे प्रवासी कोरोनाबाधित देशातून येतात व ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं आढळतात त्यांना थेट कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले जाते. तर कोरोनाबाधित देशातून येणाऱ्या पण कोरोनाची लक्षणं नसलेल्या प्रवाशांना रुग्णालयात विगलीकरण कक्षात ठेवून त्यांची तपासणी केली जाते. तर अन्य देशातून येणाऱ्या प्रवाशांना पण ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत त्यांना हातावर निवडणुकीच्यावेळी वापरल्या जाणाऱ्या शाईने विलगीकरणाचा शिक्का मारून त्यांना घरीच वेगळं राहून इतरांच्या संपर्कात येऊ नये असं सांगितलं जातं. होम क्वॉरंटाईन्ड असा शिक्का त्यांच्या हातावर मारला जातो. अशा व्यक्तिंमध्ये कोरोनाची लक्षणं नसली तरी ते परदेशातून आल्यानं खबरदारी म्हणून त्यांना वेगळं राहण्यास सांगण्यात येतं. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती