महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

मंगळवार, 17 मार्च 2020 (11:57 IST)
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ६४ वर्षीय करोनाग्रस्त रुग्णाचं निधन झालं आहे. यामुळे भारतातील मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे. 
 
करोनाची लागण झालेल्या रुग्णावर कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मंगळवारी सकाळी त्यांचं निधन झालं. ही व्यक्ती घाटकोपरला वास्तव्यास होती.
 
भारतात करोनामुळे आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या मृत्यूची नोंद कर्नाटकात झाली होती. येथे ७९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. नंतर दिल्लीतच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात ६८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रात पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे.
 
देशात करोनाची लागण झालेल्या सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
(Symbolic Photo)

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती