दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने (MNS Gudipadva melva Cancelled) मुंबईत शिवाजी पार्कवर मनसेचा मेळावा आयोजित केला जातो. या मेळाव्यासाठी मुंबईसह राज्यातून मोठ्या संख्येने मनसैनिक शिवतीर्थावर येतात. मात्र कोरोनाची साथ जास्त पसरु नये, तसेच कोरोना आटोक्यात येण्यासाठी अडचण निर्माण होऊ नये यासाठी गुढीपाडव्याचा मेळावा रद्द केला आहे. राज्यातील नागरिकांचं आरोग्य आणि सुरक्षितता या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत.‘कोरोना’चं सावट गडद आहे त्यामुळे ह्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘गुढीपाडवा मेळावा’ रद्द करत आहोत.
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 14, 2020
तसंच येत्या काही आठवड्यात महापालिकांच्या निवडणूका होणार आहेत पण एकूण परिस्थिती पाहता सरकारने ह्या निवडणुका किमान सहा महिन्यांसाठी पुढे ढकलाव्यात. pic.twitter.com/DWbkrjLBTQ