जर आपल्याला सर्दी,पडसं आणि ताप आहे, आणि आपल्याला हे वाटत आहे की हा कोरोना असू शकतो आणि आपण तपासणी करता. या नंतर आपला तपासणीचा अहवाल नकारात्मक आला आहे, अहवाल बघून आपल्याला वाटते की आपल्याला कोरोना नाही.परंतु असे समजू नका. हा भ्रम देखील असू शकतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अहवाल नकारात्मक येऊन देखील आपण कोरोनाबाधित असू शकता.
खरं तर ,बऱ्याच वेळा कोरोना चाचणीमध्ये आढळून येत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे की आता या विषाणूच्या नवीन स्ट्रेन किंवा म्युटेशन ने आपले लक्षण बदलून दिले आहेत. म्हणून बऱ्याच वेळा हे चाचणीच्या वेळी आढळून येत नाही. म्हणून निश्चिन्त होऊन असे समजू नका की आपल्याला कोरोनाची लागण लागलेली नाही .
त्यांनी सांगितले की या पूर्वी सर्दी,खोकला, ताप, गंध कमी होणे,आणि चव नसणे सारखे लक्षणे असायचे, परंतु आता असे नाही त्यांनी सांगितले की आता सर्दी, खोकला,आणि तापासह अशक्तपणा आणि जुलाब होणे या सारखे लक्षणे देखील समाविष्ट आहे. अशा परिस्थितीत जर पारंपरिक पद्धतीने तपासणी केल्यावर समजत नाही की कोरोना आहे किंवा नाही. आणि तपासणीचा अहवाल नकारात्मक येतो.