होळीचा सण जवळचा येत आहे . सध्या होळीमध्ये कृत्रिम रसायनाचे रंग वापरले जातात. त्यामुळे डोळ्यांना आणि त्वचेला त्रास होतो.आपण जरी कोरड्या रंगाने होळी खेळात आहात तरी काळजी घ्या. जेणे करून डोळ्यात किंवा तोंडात रंग जाऊ नये. डोळ्यांची काळजी न घेतल्याने ऍलर्जी, लालसरपणा किंवा अंधत्व देखील येऊ शकतो. या काही टिप्स अवलंबवून आपण डोळ्याची काळजी घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊ या.
* नैसर्गिक रंगांचा वापर करा- हानिकारक रासायनिक रंगाऐवजी हरभराडाळीचे पीठ,पलाश पाने,बीटरूट, मेहंदी पावडर, गुलमोहर, जास्वंद या नैसर्गिक वस्तूंचा वापर करून रंग बनवा आणि मग होळी खेळा किंवा आपण हर्बल रंग देखील वापरू शकता.