२५ जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंध शिथिल होणार : टोपे

गुरूवार, 29 जुलै 2021 (23:58 IST)
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंध शिथिल होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. याच अनुषंगाने टास्क फोर्ससोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक पार पाडली. या बैठकीत टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांच्यासह इतर सदस्य उपस्थितीत होते. राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल व्हावेत आणि उर्वरित ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील नियम राहावेत असा प्रस्ताव  मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे येत्या २ दिवसांत राज्यातील निर्बंध शिथिलतेबाबत अधिकृत निर्णय होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
 
राजेश टोपे यांनी सांगितले की, ‘राज्यातील २५ जिल्हे असे आहेत, जिथे पॉझिटिव्हीटी रेट आणि रुग्णवाढीचा दर कमी आहे. त्यामुळे येथील निर्बंध शिथिल करण्याचा सकारात्मक निर्णय झाला आहे. 
 
या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार…
 
मुंबई, अकोला, अमरावती, औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर,मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ
 
या ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार…
पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, बीड, अहमदनगर

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती