गेट्स फाउंडेशनकडून 10 कोटी डॉलर देण्याची घोषणा

शुक्रवार, 20 मार्च 2020 (07:57 IST)
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासठी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या गेट्स फाउंडेशनने 10 कोटी डॉलर देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय वाशिंगटनच्या मदतीसाठीही 50 लाख डॉलर देणार असल्याचे बिल गेट्स यांनी म्हटले आहे. यावेळी बिल गेट्स यांनी यांनी जनतेला शांताता राखण्याचे आणि काळजी घेण्याचेही आवाहन केले.
 
संपूर्ण जगालाच आर्थिक नुकसानाची चिंता आहे. मात्र विकसनशील देश यामुळे अधिक प्रभावित होतील. कारण, असे देश श्रींमत देशांप्रमाणे सामाजिक दृष्ट्या दूर राहू शकत नाहीत. एवढेच नाही, तर विकसनशील देशांत रुग्णालयांची संख्या आणि त्यांची क्षमतादेखील कमीच आहे. गेट्स फाउंडेशन डायग्नोस्टिक्स, वैद्यकीय विज्ञान आणि लस तयार करणाऱ्या लॅबसोबत काम करत आहे, असेही गेट्स यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती