जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध, त्याचे पालन प्रत्येक नागरिकाने करावे अशी मागणी मोदींनी केली आहे. राज्य सरकारांनीही हा आदेश पाळावा असंही मोदींनी म्हटलं आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे.
अद्याप करोनावर कोणतीही लस शोधण्यात आलेली नाही. तसंच काही उपायही शोधण्यात आलेला नाही. त्यामुळे देशवासियांची चिंता वाढणं स्वाभाविक आहे. आपल्या देशावर आलेलं हे संकट साधंसुधं नाही तरी भारत सरकार या स्थितीबाबत नजर ठेवून आहे. प्रत्येकाने संयमाने वागलं पाहिजे आणि निर्देशांचं पालन करावं, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.