राज्यात बुधवारी 767 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर 28 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात 903 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 84 हजार 338 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.71 टक्क्यांवर पोहोचला आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. मात्र नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील मृत्यूदर (Fatality Rate) 2.12 टक्क्यांवर स्थिरावला आहे. राज्यात आज 28 रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 1 लाख 41 हजार 025 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 07 हजार 391 रुग्ण सक्रीय (Active Patient) आहेत. राज्यात आतापर्यंत 6 कोटी 56 लाख 19 हजार 951 जणांची कोरोना चाचणी (Corona test) करण्यात आली आहे. त्यापैकी 66 लाख 36 हजार 425 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात सध्या 74 हजार 812 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 923 रुग्ण वैद्यकीय संस्थेत उपचार घेत आहेत.