काय सांगता ,कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 60 हजार रुपयांचा स्मार्टफोन मिळणार मोफत, जाणून घ्या काय आहे योजना
अहमदाबाद. अहमदाबाद महानगरपालिकेने लोकांना COVID-19 विरुद्ध संपूर्ण लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी लकी ड्रॉ योजना आणली आहे. ज्यांनी दुसरा डोस घेतला आहे ते या योजनेसाठी पात्र ठरतील आणि विजेत्याला 60,000 रुपयांचा स्मार्टफोन दिला जाईल, असे जाहीर करण्यात आले आहे.
बुधवारी जारी केलेल्या निवेदनात, अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन(एएमसी) ने म्हटले आहे की 1 ते 7 डिसेंबर दरम्यान अँटी कोव्हीड -19 लसींचा दुसरा डोस घेणारे लोक या योजनेसाठी पात्र ठरतील. आणि एका विजेत्यांचे नाव नंतर लकी ड्रॉ मध्ये काढण्यात येतील.
एएमसी ने म्हटले आहे की , ज्या लोकांनी दुसरा डोस घेतलेला नाही किंवा एकही डोस घेतला नाही त्यांना उद्याने, प्राणी संग्रहालय, संग्रहालये आणि खाजगी आणि व्यावसायिक भागात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात येईल