देशभरात ५४८ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नोवेल कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यात, डॉक्टर्स, परिचारिका,आणि इतर आरोग्य सेवकांचा समावेश आहे. त्यांना संसर्ग नेमका कुठे झाला याची माहिती या आकडेवारीत नाही. बहुतेक सर्व बाधित सरकारी रुग्णालयात काम करणारे आहेत. केंद्रसरकारने ही आकडेवारी जाहीर केली असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
मात्र प्रत्यक्ष बाधितांमधे काम करणारे कार्यकर्ते, वार्डबॉईज, सफाई कामगार, सुरक्षारक्षक, प्रयोगशाळा सहायक, शिपाई, धोबी आणि स्वयंपाकघर कर्मचारी यापैकी किती जणांना या विषाणूचा संसर्ग झाला याची माहिती यात दिलेली नाही.