भारताचाही 'त्या' १७ देशांमध्ये समावेश

बुधवार, 22 एप्रिल 2020 (21:56 IST)
देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग वेगाने पसरत आहे. कोरोना बाधित रुग्णांमध्ये भारतात २० हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, यांसारख्या १७ देशांमध्ये भारताचा समावेश आहे. 
 
कोरोनामुळे देशात आतापर्यंत ६४० लोकांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक महाराष्ट्रात २५१ जणांचा बळी गेला आहे. तर गुजरातमध्ये ९० लोक, मध्यप्रदेशात ७६, दिल्लीमध्ये ४७, राजस्थानात २५, तेलंगणामध्ये २३ आणि आंध्रप्रदेशामध्ये २२ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. तसेच कोरोनामुळे उत्तरप्रदेशमध्ये २० जणांचा मृत्यू झाला आहे. 
 
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोरोना बधितांचा ५२१८ हा मोठा आकडा महाराष्ट्रात आहे. तर गुजरात- २१७८, दिल्ली- २१५६, राजस्थान- १६५९, तामिळनाडू- १५९६ आणि मध्यप्रदेश १५५२ अशी संख्या समोर आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती