लहान बाळाला जर असेल बद्धकोष्ठतेची समस्या तर अवलंबवा घरगुती उपाय
गुरूवार, 30 मे 2024 (05:48 IST)
लहानमुलांच्या जन्मापासून तो एक वर्षाचा होईपर्यंत त्याच्या शरीरात अनेक बदल येतात. या दरम्यान लहान मुलांच्या आहारामध्ये सतत बदल होतो. काही समस्या सामान्य असतात जसे की बद्धकोष्ठता होणे.
दूध आणि जेवण न पचल्यामुळे लहान मुलांमध्ये बद्धकोष्ठता ही समस्या निर्माण होते. अश्यावेळेस लहान मुलं रडते. लहान मुलांना या समस्यांपासून अराम मिळावा म्हणून काही घरगुती उपाय नक्कीच अवलंबवा.
ओवा आणि बडीशोप उपाय-
ओवा आणि बडीशोप उपाय 6 महिन्या वरील बाळासाठी करावा. या उपयामध्ये आपल्याला ओवा आणि बडिशोपचा काढा बनवायचा आहे.
साहित्य-
1 कप पाणी
1 चमचा बडीशोप
1/4 ओवा
कृती-
एका पॅन मध्ये पाणी उकळून घ्यावे. आता यामध्ये एक चमचा बडीशोप आणि ओवा घालावा. मग दोन मिनिट हे शिजू द्यावे. पाण्याला गाळून घ्यावे व थंड करावे. जेव्हा हे थंड होईल तेव्हा चमच्याने बाळाला पाजावे. ओवा पाचनसंस्था सुरळीत करण्यास मदत करतो. तर बडीशोप पोट थंड ठेवण्यास मदत करते.
या गोष्टींकडे ठेवावे लक्ष-
लहान बाळ दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी सेवन करेल. बाळाच्या जेवणात फायबर युक्त पदार्थ सहभागी करावे. जर बाळ सहा महिने पेक्षा मोठे झाले आहे तर हळू हळू सर्व चाखवावे. ज्यामुळे पाचन संस्था सुरळीत राहील.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.