थंडीमध्ये मुलांची देखभाल

सोमवार, 7 डिसेंबर 2020 (14:07 IST)
साधारणतः सर्दी खोकल्याचा नंतर नाक बंद होण्याची तक्रार उत्पन्न होते. यापासून बचावासाठी मुलांना कोमट पाणी पिण्यास द्यावे अथवा वाफ द्यावी. अशा केसेसमध्ये पालक मुलांना ब्लोअरद्वारे उष्णता देण्याचा प्रयत्न करतात. ज्यामुळे रक्तप्रवाहामध्ये नुकसान पोहोचू शकते. याचबरोबर त्यांच्या मऊ आणि नाजूक त्वचेचेही नुकसान होते. 
 
श्वास घेण्यास त्रास होत असल्यास अधिक लहान मुलांना आईचे दूध पिण्यात त्रास होतो. एक वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये व्हायरल इन्फेशन सामान्य असते. यासाठी बॅक्टरियल इन्फेक्शन जबाबदार असते. सहा ते आठ महिन्याच्या मुलांच्या छाती संबंधित तक्रारींपासून बचावासाठी आईचे दूध सर्वोत्तम आहे.
 
गाई-म्हशीचे दूध, घुट्टी, मध, अथवा पाणी अशा स्थितीत न देणेच योग्य, तसेच मुलांना बाटलीने दूध पाजू नये. कारण यामुळे गॅसेस, डायरिया, न्यूमोनिया सुरू होऊ शकतो. 
 
बाटली चांगल्या प्रकारे उकळल्यानंतर साफ करावी. कारण बाटलीच्या आतील भाग चिकटलेल्या केमिकलने इम्पून सिस्टीमला नुकसान पोहोचू शकते. या दिवसात मुलांना चांगले झाकून घ्यावे. त्याचे डोके आणि आणि पाय झाकून घ्यावेत.मुलांना थंड पेये आणि डब्बा बंद ज्यूस पिण्यास देऊ नये. नॅचरल इम्प्यून बुस्टर जसे ताजी फळे, आवळा, हिरव्या भाज्या आणि ताज्या फळांपासून बनविलेला ज्यूस देणे या दिवसात फायदेशीर ठरते.
 
थंडीचा सर्वात परिणाम त्वचेवर होतो. म्हणूनच या दिवसात खाज आणि त्वचेच्या पापुद्र्यांपासून बचावासाठी स्नानानंतर योग्य प्रमाणात लोशन आणि खोबरेल तेल लावावे. 
 
याने त्वचा दिवसभर नरम राहील. अशाप्रकारे थंडीच्या दिवसात मुलांची देखभाल घेणे क्रमप्राप्त ठरते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती