मुंबईच्या जेटकिंग इन्फोट्रेनच्या सायबरमेनिया कार्यक्रमाची कोलकात्यात क्रेझ

गुरूवार, 17 नोव्हेंबर 2022 (17:20 IST)
तरुणांना आपल्या तंत्रज्ञानावर आधारित संकल्पना एकाच मंचावर प्रदर्शित करण्याची संधी. ५००० हुन अधिक विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
मुंबई स्थित जेटकिंग इन्फोट्रेनने आपले वार्षिक टेक-प्रदर्शन, सायबरमेनियाचे कोकतामध्ये  यशस्वीरित्या आयोजित केले, ज्यात माहिती आणि तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या अनंत संधी आणि भविष्यातील घडामोडींसह, जीवनाच्या अर्थाची पुनर्रचना करून, भविष्यात बदल घडवून आणण्याची ताकद कशी आहे हे दाखविण्याचा हेतू होता.
 
जेटकिंगचे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांचे सायकोमोटर कौशल्ये विकसित करणे, पीअर लर्निंगला चालना देणे, औद्योगिक आणि तांत्रिकदृष्ट्या अवगत राहण्यासाठी भविष्यवादी दृष्टीकोन जोपासणे, नवकल्पना आणि सर्जनशीलतेला केंद्रस्थानी ठेवणे, सामाजिक कौशल्ये वाढवणे आणि नेतृत्वगुण विकसित करणे हे होते.
“वर्ल्ड ऑफ मेटॉवर्स ”,“ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी”,“क्रिप्टोकरन्सी”,“क्लाउड काम्पुटिंग: डब्लूएस आणि ऍझूर”,“एथिकल हॅकिंग”,“सायबर सेक्युरिटी”,“एआय आणि रोबोटिक्स”हे निश्चितपणे कार्यक्रमाचे ठळक वैशिष्ट्य होते. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना रुची आहे आणि त्यामध्ये करिअर करायचे आहे. विद्यार्थ्यांनी या तांत्रिक संकल्पनांवर आधारित सादरीकरण केले.
 
याप्रसंगी जेटकिंग इन्फोट्रेनचे सीईओ आणि एमडी श्री हर्ष भारवानी म्हणाले कि, या कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थी त्यांच्या संकल्पना त्यांच्या प्रकल्पांमध्ये प्रतिबिंबित करू शकतील अशा तांत्रिक प्रगतीला चालना देणे हा आहे. सैद्धांतिक शिक्षण महत्त्वाचेच आहे, परंतु औद्योगिक क्रांती ४.० आणि एआय/एमएल एकीकरणाचा फायदा घेत शिक्षण आणि ४.० शिक्षण क्षेत्रातील मेटाव्हर्स, तरुण प्रतिभांना उद्योगाच्या ट्रेंडशी परिचित होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने, आम्ही आमचा कार्यक्रम आमच्या माजी विद्यार्थ्यांसाठी आणि विविध उद्योगांमधील HR साठी खुला ठेवला होता ज्यांच्याकडून मूल्यवान अभिप्राय मिळाले आणि ह्या विद्यार्थाना अधिक आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळाली.”
Published By -Smita Joshi

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती