“ये डर मुझे अच्छा लगा, आय एन्जॉय. मी या सर्व गोष्टींचा आनंद घेत आहे, मला मजा येत आहे. तुम्ही बॅनर पळवत आहात, पण बॅनर पळवल्याने काय होणार आहे. तुम्ही बॅनर पळवू शकता, शिवसैनिक पळवू शकता का? तुम्ही शिवसैनिकाचा विचार पळवणार आहात का? तुम्ही शिवसैनिकांची आमच्यासोबत असलेली आपुलकी, आपलेपणा पळवू शकणार आहात का?”शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जळगावात येण्याआधीच त्यांच्या कार्यक्रमाचे फलक (बॅनर) चोरी गेल्याचा प्रकार घडला. यावर सुषमा अंधारे यांनी जोरदार टोलेबाजी केली.
“मला वाटतं गुलाबराव पाटलांनी असे छोटे-मोठे चिल्लर चाळे करू नये. नाहीतर कुठल्यातरी गाण्यासारखं लोकंच त्यांना विचारतील की, कसं काय पाटील बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का? काल म्हणे तुम्ही गुवाहाटीला गेला, खोक्याबिक्याचा काही तरी कारभार केला. अशी वेळ गुलाबराव पाटलांनी स्वतःवर येऊ देऊ नये,” असं सुषमा अंधारे यांनी खोचकपणे म्हटलं.