भारतीय भूमी हा केवळ फलंदाजांचा बालेकिल्ला मानला जात नाही. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर ते विराट कोहली आणि रोहित शर्मा हे प्रख्यात फलंदाज आहे.आता असा फलंदाज समोर आला आहे, ज्याने वनडे क्रिकेटमध्ये 407 धावा ठोकून इतिहास रचला आहे. तन्मय मंजुनाथ असे त्या तरुण क्रिकेटपटूचे नाव आहे. 16 वर्षीय युवा क्रिकेटपटूने ही धावसंख्या करताना 48 चौकार आणि 24 षटकार मारले. याची सर्वत्र चर्चा होत आहे.
शिमोगा (कर्नाटक) येथील सागर येथील रहिवासी असलेल्या तन्मयने 50 षटकांच्या सामन्यात 407 धावा केल्या. यासाठी त्याने केवळ 165 चेंडू खेळले. तन्मय सागर क्रिकेट क्लबकडून खेळतो आणि शिमोगा येथे 50-50 षटकांची आंतरजिल्हा स्पर्धा खेळली गेली. अशाच एका सामन्यात तन्मयने भद्रावती एनटीसीसी संघाविरुद्ध ही ऐतिहासिक खेळी खेळली.
कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) अंतर्गत खेळल्या गेलेल्या सागर क्रिकेट क्लब आणि भद्रावती यांच्यातील या सामन्यात तन्मय मंजुनाथच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर संघाने 50 षटकात 583 धावा केल्या. तन्मय सागर येथील नागेंद्र क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षक नागेंद्र पंडित यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहे. मंजुनाथच्या धडाकेबाज खेळीचे सर्वजण कौतुक करत आहेत.
एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नावावर आहे.रोहितच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 द्विशतके आहेत, तर सचिन तेंडुलकरने 2010 मध्ये भारतासाठी पहिले द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला.