या प्रोग्रामची रचना शेअर बाजारात आपल्यासाठी व्यावहारिक नियंत्रण मिळवू इच्छिणाऱ्या आणि व्यापाराच्या संकल्पना व तंत्रे शिकू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी केली गेली आहे. हा १०० तासांचा ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम असून तो प्रात्यक्षिक शिक्षणावर भर देतो आणि त्याची रचना ५० वर्षांपेक्षा अधिक बाजारातील अनुभव असलेल्या टीमने केली आहे. या अभ्यासक्रमात ५० ऑनलाइन सत्रे आहेत, जी विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार पाहता येतील. सहभागींना लाइव्ह मार्केट वातावरणातही प्रशिक्षित करून मार्गदर्शन केले जाईल. या अभ्यासक्रमाच्या साहित्यात फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंगचाही समावेश आहे, ज्यांची दिशादर्शक व बिगर दिशादर्शक धोरणे आहेत. निफ्टी ५० आणि निफ्टी बँकद्वारे बाजारात नियमित स्तरावर व्यापार केल्यामुळे ट्रेडिंगमध्ये प्रावीण्य मिळवता येते. एका साधनावर सातत्यपूर्ण लक्ष दिल्यामुळे किंमतीच्या प्रवाहांबाबत अधिक चांगली माहिती मिळू शकते.
या निमित्ताने बोलताना श्री. हितेश चोटालिया, प्रमुख एज्युकेशन फिनलर्न अॅकेडमी म्हणाले की, ''हा फिनलर्न अॅकेडमीसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये एक संकल्पना म्हणून सुरूवात झालेला हा उपक्रम आज अशा एका पातळीवर पोहोचला आहे, जिथे आमच्या ७०० पेक्षा अधिक सहभागींना आमच्या विविध अभ्यासक्रमांतून मिळालेल्या शिक्षणाचा फायदा होतो आणि त्यांनी आपल्या मालमत्ता निर्मितीवर त्याचा परिणाम झालेला पाहिला आहे. आम्हाला असे वाटते की, व्यावसायिक ट्रेडिंग हे सातत्यपूर्ण रिटर्न्सशी संबंधित आहे, जे निफ्टी आणि निफ्टी बँक अशा साधनांवर फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये स्पेशलाइज करून साध्य करता येईल. फिनलर्नचा स्मार्ट इंडेक्स ट्रेडर प्रोग्राम हा पहिला ट्रेडिंग उपक्रम आहे, जो विशेषत्वाने निफ्टी ५० आणि निफ्टी बँक इंडेक्सवर व्यवहार करतो. एनएसई अॅकेडमीसोबतची आमची भागीदारी ही ट्रेडिंगच्या गुंतागुंतीच्या संकल्पना अत्यंत सोप्या करणारे अभ्यासक्रम देण्यासाठी आहे. हा अभ्यासक्रम इक्विटीच्या क्षेत्रात आपले करियर करू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांच्या वाढत्या मागण्या व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि आपले ज्ञान वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल.''
फिनलर्न अॅकेडमी बाबतः फिनलर्न अॅकेडमी हा प्रत्यक्ष वर्ग व ऑनलाइन व्यासपीठांद्वारे देण्यात येणारा व्यापार आणि गुंतवणूक शिक्षण उपक्रम आहे. विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर संशोधित व सुसंगत ट्रेडिंग आणि गुंतवणूक उपक्रम जसे शेअरबाजार, फ्युचर्स, ऑप्शन्स, कमॉडिटीज आणि करन्सी यांची रचना व प्रदान अनुभवी प्रशिक्षकांद्वारे केले जाते. अद्ययावत तंत्रज्ञान आणि प्रोग्राम डिलिव्हरीची विविध माध्यमे आणणारी फिनलर्न अॅकेडमी ही या क्षेत्रात सर्वोत्तमता साध्य करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी मोठ्या प्रमाणावर शिक्षणाच्या संधी आणत आहे. आम्ही नावीन्यपूर्ण, प्रॅक्टिकल व परवडणारे ट्रेडिंग आणि गुंतवणूक शिक्षण देण्याबरोबरच सर्व ट्रेडर्सना एकास एक पद्धतीने मार्गदर्शन करण्यासाठी वचनबद्ध आहोत. प्रत्येक अभ्यासक्रमाची रचना आणि डिलिव्हरी प्रत्येक प्रशिक्षणार्थीच्या गरजांनुरूप करण्यासाठी केली जाईल, जेणेकरून त्यांना आपली अध्ययन उद्दिष्टे साध्य करता येतील याची आम्ही खातरजमा करतो. https://finlearnacademy.com/