आपण IRCTC चे एजेंट आहात तर आपण बल्कमध्ये तिकिट बुक करू शकता. या व्यतिरिक्त सामान्य जनतेसाठी जनरल बुकिंग ओपन झाल्याच्या 15 मिनिटात आपल्याला तात्काळ तिकिट बुक करण्याचा पर्याय असतो. तिकिट रद्द करण्यात देखील कुठलीही समस्या येत नाही. आपणच रेल्वे, प्लेन आणि हॉटेलची बुकिंग देखील करू शकता. IRCTC एजंट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही प्रकाराच्या फ्लाईटची बुकिंग करू शकतात.
हे अमलात आणण्यासाठी दोन योजना आहेत. पहिली योजना 1 वर्षासाठी 3,999 रुपये आणि दुसरी योजना दोन वर्षांसाठी 6,999 रुपये या प्रकारे आहे.
आपण दर महिन्याला अधिकात अधिक 100 तिकिट बुक करू शकता आणि प्रत्येक तिकिटावर 10 रुपये बुकिंग चार्ज देय असेल. तसेच आपण 101 ते 300 तिकिट बुक करत असाल तर जार्च म्हणून 8 रुपये आणि 300 हून अधिक तिकिट बुक केल्यावर हा चार्ज 5 रुपये असतो अर्थात अधिक तिकिट बुक केल्यास आपला अधिक फायदा होईल. तसेच आपण स्लीपर आणि सेकंद सीटिंगचे तिकिट बुक करत असाल तर आपल्याला 20 रुपये प्रति पीएनआर आणि एसीच्या कोणत्याही श्रेणीसाठी तिकिटावर 40 रुपये प्रति पीएनआर कमिशन मिळेल. या प्रकारे आपण दर महिन्याला 2 हजार एसी तिकिट बुक करू शकता आणि असे झाले तर आपण 80 हजार रुपये पर्यंत कमावू शकता.