इंजिनिअरिंगमधली वेगळी वाट

बुधवार, 15 एप्रिल 2020 (13:33 IST)
विज्ञान शाखेतील बरीच मुले बारावीनंतर इंजिनिअरिंगकडे वळतात. मॅकेनिकल, कॉम्प्युटर, आयटी अशा 
इंजिनिअरिंगच्या विविध शाखा प्रसिद्ध आहेत. मात्र, यासोबतच इतर काही शाखांचा विचारही तुम्ही करू शकता. त्यापैकी एक शाखा म्हणजे पेट्रोलियम इंजिनिअरिंग. या शाखेत नैसर्गिक वायू किंवा खनिज तेलाच्या उत्पादन प्रक्रियेबाबत शिकवले जाते. पेट्रोलियम इंजिनिअर खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनांशी संबंधित क्षेत्रात कार्य करतात. भारतासह परदेशातही तुम्हाला संधी मिळू शकते.
 
पेट्रोलियम इंजिनिअरला फिजिक्स, केमिस्ट्री अशा विषयांसह मॅकेनिकल इंजिनिअरिंग, जियोलॉजी आणि इकोनॉमिक्सचे ज्ञान असणे गरजेचे असते. सध्या जगभरात पेट्रोलियम उत्पादनांच्या मागणीत बरीच वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलसारख्या इंधनांचे साठे कसे पुरवायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत पेट्रोलियम इंजिनिअर्सचे महत्त्व खूपच वाढले आहे. नैसर्गिक वायू, खनिज तेलांच्या नव्या साठ्यांचा शोध घेणे गरजेचे असते. यासाठी कुशल तज्ज्ञांची गरज असते. म्हणून पेट्रोलियम इंजिनिअर्सच्या मागणीत वाढ होणार आहे. त्यामुळे इंजिनिअरिंग करायचे असेल तर या शाखेचा विचार करता येईल.
आरती देशपांडे 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती