भारताचा पहिला अर्थसंकल्प

आधुनिक भारतात अर्थसंकल्पाची सुरुवात करण्याचे श्रेय ब्रिटिश-भारताचे पहिले व्हाईसरॉय लार्ड कॅनिंग यांना जाते. 1856-62 पर्यंत ते भारतात होते. 1857च्या उठावानंतर 1859 मध्ये पहिल्यांदा एक अर्थतज्ज्ञ जेम्स विल्सन यांना व्हाईसरॉयच्या कार्यकारिणीचे अर्थसदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले.
 
यानंतर जेम्स विल्सन यांनी 18 फेब्रुवारी 1860 ला व्हाईसरॉय परिषदेत पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केला. ब्रिटिश अर्थमंत्र्यांच्या परंपरेचे अनुकरण करत त्यांनी आपल्या भाषणात भारताच्या आर्थिक स्थिती विषयाची माहिती आणि सर्वेक्षण सादर केले. यामुळे जेम्स विल्सन यांना भारतीय अर्थसंकल्पाचे संस्थापक म्हणू शकतो.
 
1860 नंतर दरवर्षी व्हाईसरॉय परिषदेत अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा सुरू झाली. इंग्रजांचे राज्य असल्याने भारत प्रतिनिधींना या काळात आपले मत मांडण्याचा अधिकार नव्हता. 1947 देश स्वतंत्र झाला. आणि यानंतर भारतीय संसद आणि विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यात येऊ लागले. स्वातंत्र्यापूर्वी एकच अर्थसंकल्प संसदेत सादर केला जात असे. कालांतराने यात बदल होत गेले.

वेबदुनिया वर वाचा