अंतरिम बजेटमध्ये प्रमुख सबसिडीसाठी 95 हजार 578. 97 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी दिली आहे.
हंगामी अर्थमंत्र्याची जबाबदारी सांभाळत असलेल्या परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांनी संसदेत हंगामी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले, की सरकारने मुख्य सब्सिडीसाठी 95 हजार 578. 78 कोटी रुपयांची तरतुद केली आहे. त्यात खाद्यपदार्थांवरील सबसिडी 42 हजार 489.72 कोटी रुपये आहे.