‘जवान’चित्रपटाच्या ट्रेलरला फक्त २४ तासांमध्ये तब्बल मिलियन व्ह्यूज

बुधवार, 12 जुलै 2023 (07:32 IST)
‘जवान’चित्रपट दोन महिन्यांनी म्हणजेच ७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १० जुलैला ‘जवान’चा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. साडेदहा वाजता रिलीज झालेल्या या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ट्रेलर पाहून सध्या बॉलीवूडमधील कलाकार आणि किंग खानचे चाहते त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. ‘जवान’च्या ट्रेलरला एका दिवसात चांगले व्ह्यूज मिळाले आहेत.
 
‘जवान’चित्रपटाच्या ट्रेलरला फक्त २४ तासांमध्ये तब्बल ११२ मिलियन व्ह्यूज आल्याचे ट्वीट शाहरुखच्या ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ केले आहे. यापूर्वी शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ चित्रपटाद्वारे शाहरुखने तब्बल ४ वर्षांनी बॉलीवूडमध्ये पुनरागमन केले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती