सुनील शेट्टीच्या वडिलांचा मृत्यू, बर्‍याच दिवसांपासून होते आजारी

बुधवार, 1 मार्च 2017 (11:53 IST)
सुनील शेट्टीच्या वडिलांचे मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आज (बुधवार) सकाळी निधन झाले. ते 93 वर्षांचे होते आणि बर्‍याच वेळेपासून आजारी होते. सुनील आपल्या वडिलांच्या फारच जवळ होता.  
 
या वृत्तानंतर शेट्टी परिवारात शोक पसरला आहे. सांगण्यात येत आहे की त्यांचे अंतिम संस्कार उद्या करण्यात येईल. कारण सुनीलची मुलगी अथिया परदेशात शूटिंग करत आहे. म्हणून तिच्या परतण्याची वाट बघणे जरूरी आहे.  
 
असे सांगण्यात येत आहे की वडिलांच्या आजारपणानंतर सुनीलने घरातच दवाखान्यासारखी व्यवस्था केली होती आणि त्यांच्या देखरेखमध्ये कुठल्याही प्रकारची कमी करत नव्हता. 

वेबदुनिया वर वाचा