बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती बिझनेसमन राज कुंद्रा यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे दोघं आधीपासून अडचणीत सापडले आहेत. यातच त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. काही दिवसांपूर्वीच राज कुंद्राला जामीन मिळाला आहे. त्यानंतर आता त्याचं नाव आणखी एका प्रकरणात पुढे आलं आहे. मात्र यावेळी राज कुंद्रासोबत शिल्पाचेही नाव पुढे आले आहे. मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात फसवणूक आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांच्या वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये नितीन बराई नावाच्या व्यक्तीने अभिनेत्री शिल्पा शेट्टी,तिचा पती राज कुंद्रा , काशिफ खान यांच्यासह काही लोकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.हे प्रकरण 2014 चं असून तक्रारीनुसार राज, शिल्पानं बरई यांची एक कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे.
काय आहे प्रकरण?
नितीन बराई यांच्या तक्रारीनुसार 2014 मध्ये SFL फिटनेस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक काशिफ खान, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी पीडितेला फिटनेस व्यवसायात 1 कोटी 51 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितले होते.
बरई यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर आता पोलिसांनी कलम 406,409,420,506,34,120(B) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.मुंबई पोलीस या प्रकरणी सर्वांची चौकशी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी यांची बाजू जाणून घेण्यासाठी पोलिसांकडून त्यांना लवकर संपर्क करण्यात येण्याची शक्यता आहे.