रिपोर्ट्सनुसार 20 जूनपासून सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी दोघांचा हळदी समारंभ होता. आता सोनाक्षी आणि झहीर 23 जूनला नोंदणीकृत विवाहबंधनात अडकणार आहेत. यानंतर हे जोडपे त्याच दिवशी संध्याकाळी भव्य रिसेप्शनचे आयोजन करतील.