शरवरीने तिच्या हिट चित्रपट मुंज्या मध्ये आपल्या अभिनयाने आणि लुभावणाऱ्या डान्स नंबर तरस ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. आता तिला भारतातील दुसऱ्या सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी म्हणून निवडण्यात आले आहे कारण मुंज्या एक ब्लॉकबस्टर यशाची कहाणी बनली आहे! हे कुणाला ही माहित नव्हते, पण मुंज्या मध्ये शरवरीचा बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन, जस्टिस लीग सारख्या एपिक सुपरहीरो चित्रपटांसोबत एक मोठ कनेक्शन आहे!
मुंज्या एका महाराष्ट्रीयन लोककथेवर आधारित आहे आणि चित्रपटातील भूत एक अविश्वसनीयरित्या डिझाइन केलेले CGI पात्र आहे ज्याने प्रेक्षकांना पूर्णपणे प्रभावित केले आहे. CGI पात्र ब्रॅड मिनिचच्या अध्यक्षतेखालील जगातील अग्रगण्य हॉलीवुड VFX कंपन्यांपैकी एक DNEG ने तयार केले आहे. त्यांनी यापूर्वी वरील उल्लेखित मोठ्या हॉलीवुड हिट चित्रपटांवर काम केले आहे.
शरवरीने म्हणाली , “माझे निर्माते दिनेश विजान आणि माझे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा मुंज्याच्या माध्यमातून एक अनोखा नाट्यमय अनुभव देण्याचा मोठा उद्दिष्ट होत. त्यांना स्पष्ट होते की CGI पात्राने प्रेक्षकांवर प्रभाव टाकावा लागेल आणि दिनेश सरांनी त्यांच्या दृष्टिकोनाला पूर्तता करण्यासाठी सर्वोत्कृष्ट VFX कंपनीची निवड केली. जेव्हा मी चित्रपटात CGI पात्र पहिले, तेव्हा मी थक्क झाले आणि प्रेक्षकांनाही तसंच वाटतंय, त्यामुळेच आमचा चित्रपट इतका मोठा ब्लॉकबस्टर ठरला आहे.”
ती पुढे सांगते, “चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान, आमच्याकडे फक्त याचा संदर्भ होता की CGI पात्र कसे असेल, पण जेव्हा मी अंतिम रूप पाहिले, तेव्हा तो एक अविश्वसनीय अनुभव होता. या पात्राने लोकांच्या हृदयाला स्पर्श केल आहे. ब्रॅड (मिनिच) यांनी एक अपवादात्मक काम केले आहे आणि मला माझ्या करियरच्या या टप्प्यावर त्यांच्या सोबत इतक्या जवळून काम करण्यासाठी खूप भाग्यवान वाटतंय. हा पूर्णतः समृद्ध अनुभव होता.”
शरवरीने पुढे स्पष्ट केले, “ब्रॅड दररोज सेटवर असायचे आणि ते आदित्य सरांसोबत सविस्तर चर्चा करायचे. त्यांची चर्चा ऐकणे आणि जितके शक्य होईल तितके आत्मसात करणे मला खरोखरच आवडले. यामुळे मला मुंज्या पात्राला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत झाली.”