महेश बाबूच्या नवीन कारच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, इलेक्ट्रिक ऑडी ई-ट्रॉनला प्लॅटिनम ग्रे फिनिशसह सिंगल फ्रेम ग्रिल मिळते. यात 20-इंच ग्रेफाइट ग्रे डायमंड-कट अलॉय व्हील्स देखील मिळतात. ई-ट्रॉनची लांबी 5,014 मिमी, उंची 1,686 मिमी आणि रुंदी 1,976 मिमी आहे. बेस व्हेरियंटमध्ये 660 लीटरची बूट स्पेस आहे जी मागील सीट खाली फोल्ड करून 1,725 लीटरपर्यंत वाढवता येते.