Syed Gulrez प्रसिद्ध कादंबरीकार आदिल रशीद यांचा मुलगा आणि अष्टपैलू लेखक सय्यद गुलरेज यांचे निधन झाले आहे. त्यांनी 4 नोव्हेंबर रोजी त्यांच्या लॉस एंजेलिस येथील घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. त्यांनी अनेक दिग्गज संगीतकारांसोबत काम केले आहे. त्यांनी नुसरत फतेह अली खान, बप्पी लाहिरी, नौशाद अली, विजू शाह, अनु मलिक, बापा लाहिरी, अभिषेक रे, गौरव दासगुप्ता यांसारख्या संगीतकारांसोबत काम केले आणि व्हीनस आणि इतर आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी अनेक अल्बम तयार केले.