वृत्तानुसार कुमार रामसे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. कुमार रामसे हे सात भावांमध्ये सर्वात मोठे होते. यापूर्वी 2019 मध्ये, रॅम्से ब्रदर्सपैकी श्याम रामसे यांचे 67 व्या वर्षी निधन झाले. कुमार रामसे हे चित्रपट निर्माते एफ यू रामसे यांचे पुत्र होते. कुमार आपल्या सात भावांमध्ये सर्वात मोठे होते. रामसे बंधूंमध्ये केशु, तुलसी, करण, श्याम, गंगू आणि अर्जुन हे भावंड आहेत.
कुमार रामसे यांचां थोरला मुलगा गोपाळ यांनी सांगितले की त्यांच्या वडिलांनी हिरानंदानी येथील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. आज पहाटे साडेपाच वाजता हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ते अत्यंत शांतपणे निघून गेले. कुमार यांच्या पश्चात पत्नी शीला आणि तीन मुले राज, गोपाळ आणि सुनील असा परिवार आहे.
निर्मिती आणि लेखनात मोठे योगदान
पुराना मंदिर (1984), साया आणि खोज (1989) यासह रामसे ब्रदर्सच्या बहुतेक चित्रपटांसाठी स्क्रिप्ट लिहिण्यात कुमार यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. साया मध्ये मुख्य भूमिका शत्रुघ्न सिन्हा यांनी साकारली होती आणि 1989 ची हिट फिल्म खोज मध्ये अभिनेते ऋषी कपूर आणि नसीरुद्दीन शाह यांच्या मुख्य भूमिका होत्या. 1979च्या और कौन आणि 1981मध्ये दहशत सारख्या चित्रपटांची निर्मिती देखील केली होती.