जॅकलीन फर्नांडीसने केले योलो (YOLO) फाउंडेशनचे अनावरण; समाजात चांगुलपणा पसरवण्यासाठी सदैव राहणार प्रयत्नशील!

बुधवार, 5 मे 2021 (13:58 IST)
अभिनेत्रीने नेहमीच्या आयुष्यातील दयाळूपणा आणि चांगुलपणाच्या कथा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी एका फाउंडेशनची स्थापना केली असून या चांगल्या आणि समाजोपयोगी कामासाठी जॅकलीनने अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत जोडून घेतले आहे; ज्या समाजाच्या हितासाठी अतिशय उपयुक्त असे काम समाजाच्या तळागाळात जाऊन काम करत आहेत.
 
‘रोटी बैंक’ नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून, जॅकलीन या महिन्यात एक लाख लोकांपर्यंत जेवण पोहोचवणार असून फीलाइन फाउंडेशनसोबत, अभिनेत्रीने भटक्या जनावरांच्या सहाय्यासाठी एक उपक्रम सुरु केला आहे. त्यासोबतच, कोविड काळातील फ्रंट लाइन कार्यकर्ता मुंबई पोलिस दलाला मास्क आणि सॅनिटायझरचे देखील वितरण करण्यात येणार आहे.  
 
जॅकलीनने आपल्या सोशल मीडियावर याबाबतची एक पोस्ट शेअर करताना लिहिले, "We have this one life, let’s do whatever we can to make a difference in this world!! I am proud to announce the launch of the YOLO Foundation; an initiative to Create and Share Stories of Kindness

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती