दिशा पाटनीला किस केलेलं नाही: सलमान खान

रविवार, 2 मे 2021 (12:35 IST)
अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट 'राधे' येत्या १३ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील २ गाणी रिलीज झाली असून प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली असली तर चर्चा फक्त एकच गोष्टीची आहे ती म्हणजे किसिंग सीनची. सलमान खान ऑनस्क्रीन किस करत नाही मग त्याने दिशा पाटनीसोबत सीन कसा काय दिला याची चर्चा सातत्याने सुरु आहे. 
 
अलीकडेच एका व्हिडिओत सलमान खानने या सीनबद्दल सांगितले की या चित्रपटात एक किसिंग सीन आहे. दिशासोबत हा सीन असला तरी मी दिशाला किस केलेलं नाही. मी सेलोटेपवर किस करुन हा सीन शूट करण्यात आला आहे. 
 
सलमान खान आणि दिशा पाटनी यांचा एकत्र दुसरा चित्रपट आहे. या आधी हे दोघंही 'भारत' चित्रपटात एकत्र दिसले होते. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभू देवानं केलं आहे. यात रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती