इतकेच नाही, तर रितिकाने महान गायिका, गान सरस्वती लता मंगेशकर यांची भेट झाल्याचा एक किस्साही सांगितला. त्यामुळे हा भाग आणखी रोचक होऊन गेला. रितिका म्हणाली, “माझ्याकडे एक फोटो आहे, ज्यामध्ये मी 13 वर्षाची आहे. या फोटोत माझे डोके लता जींच्या मांडीवर विसावले आहे. लताजींनी जेव्हा प्रवेश केला, तेव्हा त्यांच्या भोवती एक आभा आम्हाला जाणवली होती. त्यांनी नमस्कार करून सर्वांना अभिवादन केले आणि आम्हाला खाली बसायला सांगितले व वातावरण हलके-फुलके करण्याचा प्रयत्न केला.