या चित्रपटात ऋतिक आणि एनटीआर यांचं पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर टोकदार आमनेसामना होणार आहे. आणि हाच क्षण खास राखण्यासाठी वायआरएफ ने ठरवलंय की दोघं कधीच एकत्र स्टेजवर, व्हिडिओमध्ये किंवा प्रमोशन इव्हेंटमध्ये दिसणार नाहीत.
एक वरिष्ठ ट्रेड सूत्र सांगतात, “वॉर 2 चा मुख्य यूनिक सेलिंग पॉइंट म्हणजे ऋतिक आणि एनटीआर यांच्यातील तीव्र टक्कर. ती भावना लोकांपर्यंत जशीच्या तशी पोहोचावी म्हणून वायआरएफ दोघांना एकत्र प्रमोट करणार नाही. प्रेक्षकांना आधी ही भिडंत सिनेमात पाहायची आहे – त्यानंतरच त्यांना ऋतिक-एनटीआरची मैत्रीप्रेमाची झलक मिळावी, अशी ही कल्पक संकल्पना आहे.”
वायआरएफ पूर्वीही अशा क्रिएटिव्ह मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरत आले आहे. पहिल्या वॉरमध्येही ऋतिक आणि टायगर फक्त सक्सेस पार्टीसाठी एकत्र आले होते. पठाणच्या प्रचारावेळी शाहरुख खानने कुठल्याही इव्हेंटला हजेरी न लावता फक्त सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे चित्रपटाचं प्रमोशन केलं – आणि त्याचा परिणाम म्हणजे ब्लॉकबस्टर यश.