अनाइता म्हणते ,"धूम 2, बैंग बैंग आणि अनेक जाहिरातींनंतर वॉर हा एक वेगळा टप्पा होता. आपण 'ग्रंज' लूकपासून दूर जाऊन एक अधिक क्लीन, शार्प आणि तरीही धाडसी लूक तयार केला—जणू सुपरहिरो साध्या कपड्यांतच. निर्धार असलेला पण सहज वाटणारा लूक."
त्या पुढे म्हणतात "वॉर 2 मध्ये कबीर या पात्रामध्ये अधिक गडद आणि भावनिक बाजू उलगडण्याचा प्रयत्न आहे. फॅब्रिक्स अधिक साधे, वापरलेले वाटणारे, थोडे बिनदिक्कत, पण तरीही ती धार त्याच्या व्यक्तिमत्त्वातून स्पष्टपणे दिसते."
अनाइता सांगते , "वॉर मध्ये जे यशस्वी ठरले—जसं त्याचा कटिंग लूक, करिष्मा—ते सगळं घेऊन त्यावर आणखी काम केलं आहे. लूक, अटिट्यूड आणि संयम यांचं सुंदर मिश्रणच वॉर 2 साठी कबीरला खास बनवतं."
फिल्ममध्ये कियारा अडवाणी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे.
वॉर 2 , 14 ऑगस्ट 2025 रोजी हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.