श्रेयस तळपदे विरोधात चिट फंड घोटाळा प्रकरणात FIR दाखल

शुक्रवार, 28 मार्च 2025 (10:52 IST)
बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत सापडला आहे. आता त्याच्या आणि इतर 14 जणांविरुद्ध उत्तर प्रदेशात फसवणुकीचा एक नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोप महोबा जिल्ह्यात गेल्या दशकाहून अधिक काळ चालणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या चिट फंड घोटाळ्याशी जोडलेले आहेत.
ALSO READ: प्रसिद्ध गायक सोनू निगमच्या लाईव्ह शो दरम्यान दगडफेक
वृतानुसार, श्रेयस तळपदे आणि इतर आरोपी लोणी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट अँड थ्रिफ्ट  को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या नावाच्या कंपनीशी संबंधित होते. गुंतवणुकीवर उच्च परतावा देण्याचे आश्वासन देऊन त्यांनी ग्रामस्थांना लक्ष्य केले होते. ग्रामस्थांनी फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. 
ALSO READ: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या आलिशान कारला अपघात
या पूर्वी देखील श्रेयस तळपदे यांची फेब्रुवारीत लखनौमध्ये गुंतवणूकदारांची 9 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी ज्येष्ठ अभिनेते अलोकनाथ यांचे देखील नाव समाविष्ट आहे. श्रेयसने आतापर्यंत या आरोपाबाबद्दल कोणतेही सार्वजनिक विधान केले नाही. 
ALSO READ: स्टेजवर ढसाढसा रडली नेहा कक्कर, चाहत्यांनी दिली प्रतिक्रिया
श्रेयस तळपदे वेलकम टू द जंगल मध्ये दिसणार आहे. या मध्ये अक्षयकुमार, संजयदत्त, रवीना टंडन, अर्शद वारसी, परेश रावल  कलाकारांचा समावेश आहे. 
Edited By - Priya Dixit

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती