बिकिनी : हा तोकडा पोशाख फॅशनमध्ये कसा आला? त्यामुळे कशी खळबळ उडाली?

गुरूवार, 15 डिसेंबर 2022 (19:28 IST)
Author,कात्या फोअरमन
Twitter
'पठाण' सिनेमात दीपिका पदुकोणने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून सध्या गदारोळ सुरू आहे.
 
या बिकिनीच्या रंगाचा संंबंध आता हिंदुत्वाशीही जोडला जात आहे. बिकिनीवरून आपल्याकडे हा वाद सुरू असताना मुळात हा पोशाख फॅशनमध्ये आला कोठून?
 
स्ट्रिंग बिकिनी 1946 साली पहिल्यांदा सादर झाली आणि तिला तत्काळ लोकप्रियता मिळाली. या छोटासा पेहेराव डिझाइन आयकन कसा झाला?
 
पॅसिफिक बेट... 1940 च्या दशकातील अणुबॉम्बची चाचणी झालेल्या दुर्गम ठिकाणाचे नाव हे उन्हाळ्यात परिधान करण्याच्या अत्यंत मादक व आकर्षक पेहेरावाला दिले जाईल, असा विचार तरी कुणी केला असेल का?
 
फ्रेंच मेकॅनिकल इंजिनीअर लुई रिआर्ड यांनी वेगळी वाट चोखाळत बिकिनी डिझाइन केली. त्यांना बिकिनीच्या आधुनिक अवताराचे जनक म्हटले जाते. त्यांनी मोनिकरला अजून लहान करत त्यातून विस्फोटक परिणाम साधला. हा मादक स्विमसूट्स परिधान करणाऱ्यांना 'बॉम्बशेल' म्हटले जात असे.
 
1946 मध्ये लुईस रेअर्डने स्ट्रिंग बिकिनी लाँच केली आणि कॅसिने दे पॅरिसमधील एका न्यूड डान्सरने या ही बिकिनी घालून मॉडेलिंग केले होते. त्यावेळीही त्याची प्रचंड चर्चा झाली होती.
 
1940 च्या अखेरीस अणुबॉम्बच्या चाचण्या करण्यासाठी वापर करण्यात आलेल्या पॅसिफिक महासागरातील एका बेटाचे बिकिनी हे नाव या पेहेरावाला देण्यात आले.
 
बिकिनी गेली अनेक शतके अस्तित्वात आहेत. सिसिलीमधील एका रोमन व्हिलामध्ये चौथ्या शतकातील बिकिनी गर्ल्स ही चित्रे असलेली फरशी सापडली.
 
मेरिलिन मन्रो यांनी 1950 च्या दरम्यान चित्रीकरणापासून विश्रांती घेतली होती. हॉलिवूडमधील आपल्या घराजवळील समुद्रकिनाऱ्यावर धमाल करत होती.
 
1956 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अँड गॉड क्रिएटेड वुमन' या चित्रपटात ब्रिजिट बारडॉटची व्यक्तिरेखा टू-पीस बिकिनीमध्ये दिसली होती. तिला पाहून प्रेक्षक स्तिमित झाले होते.
 
पण, 'डॉ. नो' या चित्रपटात उर्सुला आंद्रेस पांढऱ्या रंगाची बिकिनी परिधान करून ओलेती होत समुद्रातून येते तेव्हा बिकिनीने अधिक लक्ष वेधून घेतले.
 
'डाय अनदर डे' या बाँडपटात हॅली बेरीने आंद्रेने गाजविलेले हे दृश्य नव्याने साकार केले.
 
1966 मध्ये प्रदर्शित वन मिलियन इयर्स बीसी या चित्रपटात रॅक्वेल वेल्श केव्ह वूमन म्हणून बिकिनी अवतारात पडद्यावर दिसली होती. बिकिनी पडद्यावर दिसण्याचा हा अजून एक आठवणीतला क्षण.
 
1964 मध्ये रुडी गर्नरीचने विवादास्पद टॉपलेस वन-पीस बिकिनी म्हणजेच मोनोकिनी सादर केली. पेगी मोफिट हिने या बिकिनीसाठी मॉडेलिंग केले होते.
 
न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये मायकल कोर्सच्या मॉडेलनी अंग झाकणारी, पूर्वीच्या शैलीतील बिकिनी परिधान केली होती.
 
रिआर्ड यांनी आपल्या पालकांचा अंतर्वस्त्रांचा कौटुंबिक व्यवसाय हाती घेतला होता. त्यांची स्पर्धा जॅक्स हिम या फॅशन डिझायनरशी होती. असे सांगितले जाते की, सेंट टोपेझ या समुद्रकिनाऱ्यावर स्त्रिया टॅनिंग करून घेताना आपल्या स्विमसूटच्या बॉटमला घडी घालत असल्याचे पाहून रिआर्डने  जगातील सर्वात लहान आकाराचा टू-पीस पेहेराव डिझाइन केला. (पहिला प्रत्यक्ष परिधान करण्याजोगा टू-पीस स्विमवेअर डिझायनर कार्ल जॅन्झेन यांनी 1913 साली तयार केला होता.)
 
टू-पीसमधील प्रमाण व कापड कमी करण्यासाठी आपल्या तांत्रिक कौशल्याचा वापर करत 1946 मध्ये रिआर्डने स्ट्रिंग बिकिनी सादर केली. यात चार त्रिकोण होते आणि स्पघेटीसारख्या पट्ट्यांनी ते जोडलेले होते. कॅसिनो दे पॅरिसमधील न्यूड डान्सरची या बिकिनीचे मॉडेलिंग करण्यासाठी नियुक्ती केली.
 
त्याने सांस्कृतिक विस्फोट झाला होता. प्रथमच बिकिनी बॉटम बेंबीच्या खाली आला होता.
 
केवळ दशकभरापूर्वी स्त्रिया समुद्रकिनाऱ्या जो पेहेराव करत होत्या त्याच्या अगदी विरुद्ध असे हे रिआर्डचे डिझाइन होते.
 
या बिकिनीसाठी 'लेस इज मोअर' हे मार्केटिंग कॅम्पेन करण्यात आले होते. एका वेडिंग रिंग (लग्नाच्या अंगठीतून)  टू-पीस जाऊ शकत नसेल तर ती खरी बिकिनी नाही, असा दावा या कॅम्पेनमध्ये करण्यात आला होता.
 
अर्थात, बिकिनी या त्याच्याही आधीपासून अस्तित्वात आहेत. सिसिलीमधील एका रोमन व्हिलामध्ये चौथ्या शतकातील बिकिनी गर्ल्स ही चित्रे असलेली फरशी सापडली. यात टू-पीस बिकिनी घातलेल्या आणि त्यातून शरीरप्रदर्शन करणाऱ्या स्त्रिया मजा-मस्ती करताना दाखवल्या आहेत.
 
सामान्य कापडापेक्षा त्या वेगळ्या आहेत. बहुधा अत्यंत पातळ चामड्यापासून तयार केल्या आहेत. खरे तर पाण्यात घालण्यासाठी त्या अजिबातच उपयुक्त नाहीत. पण अशा प्रकारची चित्र काढण्याचे कंत्राट देणाऱ्या मॅक्झिमिलिअन या रोमन सम्राटाला त्याच्याशी काही देणे-घेणे नव्हते.
 
त्याला फक्त आकर्षक स्त्रिया पाहायच्या होत्या. म्हणूनच आजच्या बिकनी, टेक्स्टाइल इंजिनीअरिंगचा आविष्कार असलेला हा पेहेराव मुख्यतः आकर्षक दिसण्यासाठीच आहे.
 
बिकिनीच्या डिझाइनमध्ये झालेले बदल हे स्त्रीमुक्ती, स्वातंत्र्याचे प्रतीक आणि शरीराबद्दलचा आत्मविश्वास दर्शविणारे आहेत आणि रुपेरी पडद्यावरील तारका या भावनेला अजून बळ देतात. यातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे 'अँड गॉड क्रिएडेट वूमन' हा 1956 मध्ये प्रदर्शित झालेला फ्रेंच चित्रपट.
 
या चित्रपटात ब्रिगिट बार्डोटने आपले मादक अवयव जेमतेम झाकणारी बिकिनी परिधान केली होती आणि अर्थातच डॉ. नो (1962) या चित्रपटातील उर्सुला आंद्रेचा बिकिनीमधील क्षण प्रेक्षकांच्या मनात कायमचा कोरला गेला आहे. लष्कराचा चाकू लावण्याचा पट्टा, त्यात असलेला खंजीर आणि ओलेती आंद्रे (हेच दृश्य 'डाय अनदर डे' या चित्रपटात हॅल बेरीने पुन्हा साकारले होते) साक्षात घातक मदनिका होती.
 
2001 मध्ये आंद्रेसने या बिकिनीचा लिलाव केला होता. या बिकिनीसाठी 61,500 डॉलरची बोली लागली होती. ही किंमत अपेक्षेपेक्षा थोडीशी कमी होती.
 
 स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड या अमेरिकेतील नियतकालिकाने आपली पहिली स्मिमसूट आवृत्ती 1964 मध्ये प्रकाशित केली. याच वर्षी आधुनिकतेचे भोक्ते, ऑस्ट्रियात जन्मलेले अमेरिकन फॅशन डिझायनर, नग्नतेचे खुले समर्थक, गे कार्यकर्ते, लैंगिक स्वातंत्र्याचे प्रचारक रुडी गर्नेरिच यांनी विविदास्पद टॉपलेस वन-पीस मोनोकिनी सादर केली. पेगी मोफिटने मोनोकिनीघालून मॉडेलिंग केले होते.
 
सत्तरीच्या एकूण मुक्तीच्या दशकात या मोनोकिनीने वादळ आणले. पाच वर्षांत वक्षस्थळ अनावृत्त होईल हा गर्नेरिचने केलेला अंदाज मात्र खरा ठरला नाही.
 
मोनोकिनीची धाकडी बहिणी प्युबिकिनी (ही बिकीन ब्रीफ असते. यात कंबरेखालचा भाग व्ही आकाराच्या कटमधील पट्ट्या असतात, आणि तो भाग अनावृत्त असतो) 1985 मध्ये ही बिकिनी सादर करण्यात आली. पण ती लोकप्रिय झाली नाही.
 
आजच्या काळात मोनोकिनी म्हणजे बिकिनी टॉपशिवाय घालण्यात येणारे बिकिनी बॉटम्स. याचा एक अवतार म्हणजे हाफ-किनी. व्हिक्टोरियाज सीक्रेटच्या कॅटलॉगमध्ये मूळ व्हर्जनपेक्षा कमी कापड वापरन तयार करण्यात आलेल्या बिकिनीचा समावेश आहे.
 
हाफि-किनीमध्ये स्कम्पी (अंगप्रदर्शन करणाऱ्या) बॉटम्स आणि त्यांच्या मध्यभागाकडून एक पट्टी वरच्या बाजूला गेलेली असते, जी मानेभोवती बांधली जाते आणि स्तन अनावृत्त असतात. हा लूक कदाचित रिओ-दि-जिनेरोमध्ये चालून जाईल.
 
तिथे 1948 मध्ये अर्जेंटिनातील तीन मुलींनी समुद्रकिनाऱ्यावर टू-पीस बेदिंग सूट घालून सनबाथ घेतला होता आणि त्यामुळे या मादक बेदिंग वेअरची खूप चर्चा झाली होती.
 
स्ट्रिंगची भर
गेल्या काही दशकांमध्ये बिकिनी बॉटम व बँडॉ (स्ट्रॅपरहीत टॉप) यांची जोडी असलेली टॅनकिनी पासून ते ब्राझिलियन थाँगपर्यंत बिकिनीचे अनेक अवतार सादर करण्यात आले आहेत.
 
त्रिकोणी टॉप्स, टाय-टॉप्स आणि हॉल्टर टॉप्स आणि खालील भागासाठी टी-स्ट्रिंग, जी-स्ट्रिंग आणि व्ही स्ट्रिंग (व्हिक्टोरिया सीक्रेटने ब्रँडिंग केलेली जी-स्ट्रिंग) असे बिकिनीचे प्रकार आहेत.
 
यात पार्श्वभागाकडील बाजूस विविध डिझाइन पाहायला मिळतात. आजच्या घडीला किमान कपड्यातील पिवळे पोल्का डॉट्स असलेली बिकनी, लारा क्रॉफ्टसारखी स्पोर्टी स्टाइल किंवा मोठा बॉटम असलेली, हॉलिवूड तारकांची आठवण करून देणारी बिकिनी असे अनेक प्रकार प्रचलित आहेत.
 
अलीकडील काळात पूर्वीच्य काळातील स्विमवेअरप्रमाणे अंग झाकणाऱ्या बिकिनी परतल्या आहेत. त्याचप्रमाणे वन-पीस बिकिनीची मागणीही वाढली आहे. एकीकडे रिहानासारखी सेलेब्रिटी मॉलमध्ये बिकिनी घालू जात आहे, तर दुसरीकडे या धक्कातंत्राला विटलेल्यांसाठी अंग झाकणारी बिकिनी हा उतारा आहे.
 
खरे तर हा अत्यंत सुलभ पेहेराव आहे, पण त्यात तितकीच ताकद आहे. बिकिनी हे कायमच आकर्षण राहिले आहे आणि ते एक ठाम सामाजिक किंवा फॅशन स्टेटमेंट आहे.
 
बिकिनी हा अत्यंत कमी कापडातील घडविलेला पेहेराव असून बिकीनीचे विविध प्रकारचे कट्स आणि फिनिशेस यातून बदलत्या आकारशास्त्राचे मायने आणि फॅशन दिसून येते.
Published By -Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती