बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट मुलीला जन्म दिल्यापासून चर्चेत आहे. काही चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे अभिनंदन करत आहेत, तर काही कपूर कुटुंबाची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. दरम्यान आलिया भट्ट आणि रणबीरचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर आलिया भट्ट आणि त्याच्या मुलीला कारमधून घरी घेऊन जात आहे.
आलियाने 6 नोव्हेंबर रोजी एका मुलीला जन्म दिला, त्यानंतर तिने इंस्टाग्रामवर लहान परीचं स्वागत करत एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली. रिपोर्ट्सनुसार रणबीरने आपल्या मुलीला पहिल्यांदा हातात घेतले तेव्हा त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.