बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफनं नुकतंच फॅशन आणि लाइफस्टाइल मॅग्झीन 'वोग' इंडिया मासिकासाठी एक खास फोटोशूट केलं आहे. जूनमध्ये येणार्या तेर्सीश मासिकाच्या कव्हर पेजवर कॅटरिना झळकणार आहे.
कॅटरिनानं आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कॅटरिना पाण्यामध्ये पोहताना दिसून येते आहे. या व्हिडिओमध्ये कॅटरिना एखाद्या जलपरीप्रमाणे दिसते आहे.
मासिकाच्या कव्हर पेजवर कॅटरिना ज्या ड्रेसमध्ये दिसते आहे तो ड्रेस प्रसिद्ध फॅशन डिझायनर टॉम फ्रोड आणि अनिता श्रॉफ यांनी डिझाइन केला आहे. कॅटरिनाचं हे खास फोटोशूट फिलीपाईन्समधील ‘सेबू’मध्ये करण्यात आलं आहे.