दैनिक राशीफल 19.06.2018

मेष : घराच्या विषयांमध्ये वेळ उत्तम. कार्यात सहकार्यांचा सहयोग मिळेल. अधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल. 
 
वृषभ : आनंदाची बातमी मिळेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. 
 
मिथुन : तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या मित्राला संताप येईल, असे कही बोलू नका.
 
कर्क : महत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल.
 
सिंह : वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ मिळेल. कामात व्यस्तता अधिक असल्यामुळे आरोग्यावर विपरीत प्रभाव पडू शकतो. 
 
कन्या : आपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. 
 
तूळ : आरोग्याची काळजी घ्या. अधिक व्यग्र राहील. वाहने काळजीपूर्वक चालवा. अनावश्यक चिंता टाळा. अधिक खर्च होईल. 
 
वृश्चिक : प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य वागण्याचा प्रयत्न करा एखादी प्रणयपूर्ण संध्याकाळ आपल्यासाठी आनंद आणि उल्हास आणू शकते. 
 
धनू : आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. 
 
मकर : कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही. शत्रूंपासून सावध राहा. व्यापार-व्यवसायात देवाण-घेवाण टाळा. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. 
 
कुंभ : एखाद्या कार्यासाठी सहयोग घ्यावा लागेल. व्यापार-व्यवसायात स्थिती साधारण राहील. शत्रूंपासून सावध राहा. आरोग्य मध्यम राहील. 
 
मीन : आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे महत्त्वाच्या नवीन प्रोजेक्ट आरंभ करण्याची योग्य वेळ आता आली आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती