Tourism :व्हिसाशिवाय आपण या 5 देशांमध्ये फिरू शकता

बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (16:35 IST)
आपल्याला भटकंती करायची आवड आहे आणि आपण देशाबाहेर फिरू इच्छिता, पण आपल्या कडे व्हिसा नाही आणि आपल्याला भारताच्या बाहेर भटकंती करायची आहे  आणि तेही व्हिसा शिवाय . तर आपण सहज  या 5 देशांमध्ये फिरू शकता. हे  देश आपल्या कडून  व्हिसा मागणार नाही आणि आपण  इथे खूप स्वस्तात फिरू शकता. एखाद्या देशाला भेट देण्यासाठी व्हिसा मिळवणे खूप महाग आणि अवघड प्रक्रिया आहे, परंतु भारतीय पासपोर्ट धारकांना अनेक देशांमध्ये व्हिसा फ्री एंट्री किंवा व्हिसा ऑन अराइव्हलची सुविधा मिळाली आहे.आपण या देशात व्हिसा शिवाय प्रवास करू शकता.चा तर मग ते देश कोणते आहेत जाणून घ्या.
 
 
1. भूतान ( Bhutan):  हिमालयीन खोऱ्यांमध्ये वसलेला भूतान एक अतिशय सुंदर देश आहे. इथे आपल्याकडे पासपोर्ट नसला तरी आपण फोटो आयडीसह प्रवेश घेऊ शकता. येथे आपण व्हिसाशिवाय 14 दिवस प्रवास करू शकता. येथे गेल्यानंतर शांतता आणि आनंद अनुभवाल. हे बौद्ध बहुसंख्य राष्ट्र आहे.
 
2. नेपाळ ( Nepal): हा देश हिमालयीन खोऱ्यांमध्ये वसलेला सुंदर देश आहे. येथे भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. आपण इथे व्हिसा शिवाय प्रवास करू शकता. येथे प्रवेश करण्यासाठीचे नियम खूप सोपे आहेत, ज्यामुळे भारतीय पर्यटकांना इतर देशांपेक्षा येथे प्रवास करणे अधिक आवडते. हे हिंदू बहुसंख्य राष्ट्र आहे.
 
3. मॉरीशस ( Mauritius ) : मॉरिशस एक सागरी बेट आहे. हा सुद्धा एक अतिशय सुंदर देश आहे. हा देश पासपोर्टच्या आधारावर भारतीयांना व्हिसाशिवाय प्रवेश देखील देतो. आपण इथे 90  दिवस व्हिसा शिवाय प्रवास करू शकता. हे हिंदू बहुसंख्य राष्ट्र आहे.
 
4.  मालदीव ( Maldives ) :   मॉरिशस प्रमाणे महासागर बेटमध्ये मालदीव अतिशय सुंदर बेट आहे.इथे. समुद्राच्या लाटांचा आनंद घेण्यासाठी आणि इतर अनेक गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आपण सुमारे 30 दिवस व्हिसाशिवाय येथे प्रवास करू शकता. दरवर्षी भारतीय पर्यटक मोठ्या संख्येने सुट्टीचा आनंद घेण्यासाठी येथे येतात. हा मुस्लिम बहुसंख्य देश आहे.
 
5. इंडोनेशिया ( Indonesia ) : इंडोनेशिया आपल्या सौंदर्यासाठी ओळखले जाते. भारताचे लोक येथील बाली बेटाला भेट देण्यासाठी जातात. बाली हा हिंदू बहुसंख्य प्रदेश आहे तर इंडोनेशिया मुस्लिम राष्ट्र आहे. येथे आपण 30 दिवसांसाठी व्हिसाशिवाय फिरू शकता. मात्र, नवीन नियम काय आहेत ते पाहिले पाहिजे.
 
त्याचप्रमाणे फिजी आणि कतारमध्येही तुम्ही फिरू शकता. आपण जाण्यापूर्वी व्हिसा नियम आणि सर्व देशांच्या राजकीय परिस्थितीबद्दल नवीनतम अपडेट मिळवून घ्यावे. 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती