उत्तराखंडला देवांची भूमी म्हटले जाते. देवभूमी उत्तराखंडमध्ये मोठी धार्मिक स्थळे आहेत. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ हे चार धाम उत्तराखंडमध्ये आहेत तसेच हरिद्वारमध्ये हर की पौरीचे खूप महत्त्व आहे. हर की पौरी हे हरिद्वारमधील सर्वात महत्त्वाचे धार्मिक स्थळ असून येथे दरवर्षी लाखो भाविक गंगेत स्नान करतात.
हर की पौरी अर्थात प्रभू विष्णूचे पाय. प्राचीन काळी समुद्रमंथनाच्या वेळी बाहेर पडलेल्या अमृतावर देव आणि दानवांमध्ये युद्ध झाले तेव्हा विश्वकर्मा राक्षसांकडून अमृत हरण करत असताना अमृताचे काही थेंब पृथ्वीवर पडले होते. जिथे -जिथे हे थेंब पडले तिथे- तिथे धार्मिक स्थळे निर्मित झाले. तेव्हा हरिद्वारमध्येही काही थेंब पडले होते आणि नंतर या ठिकाणाला हर की पौरी असे म्हणतात.