डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण - आरोपींना मुंबईबाहेर जाण्यास परवानगी

सोमवार, 28 ऑक्टोबर 2019 (10:24 IST)
मुंबईतील डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी आरोपी असलेल्या तीन महिला डॉक्टरांना दिवाळीसाठी मुंबईबाहेर जाण्याची परवानगी उच्च न्यायालयाने दिलीय. मात्र, प्रवासाबाबत सर्व माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला द्यावी लागणार आहे. मुंबई हायकोर्टानं हे आदेश दिलेत. 
 
डॉ. पायल तडवी यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप तिन्ही महिला डॉक्टरांवर आहे. या तिन्ही महिला डॉक्टर पायल यांच्या वरिष्ठ सहकारी होत्या.
 
डॉ. पायल तडवी यांच्यावर जातिवाचक टिप्पणी आणि मानसिक छळ केल्याचा आरोप तिन्ही महिला डॉक्टरांवर आहे.
 
या आत्महत्येप्रकरणी आरोपी महिला डॉक्टर जामिनावर बाहेर आहेत. मात्र, खटला सुरू असेपर्यंत शहर सोडून बाहेर जाता येणार नाही, असं कोर्टानं बजावलं होतं. त्यानंतर गावी जाण्यासाठी या महिला डॉक्टरांनी अर्ज केला होता. त्यानंतर कोर्टानं मुंबईबाहेर जाण्याची परवानगी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती