कोल्हापुरात भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही, याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्यावर निशाणा साधला. "सोयीचं राजकारण करणारी मंडलिक ही एक प्रवृत्ती आहे. त्याचा शिवसेनेने आता विचार करायला हवा," असं चंद्रकांत पाटील म्हणाले.