बाबासाहेबांचा प्रामाणिकपणा

सोमवार, 2 डिसेंबर 2019 (17:13 IST)
ही घटना स्वातंत्र्यापूर्वीची आहे. सन १९४३ मध्ये बाबासाहेब भीमराव आंबेडकर ह्यांना व्हाईसराय कॉन्सिलमध्ये समाविष्ट करून कामगार मंत्री केले गेले. याच बरोबर ते सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) कडे देखील होते. या विभागाचे बजेट कोटींमध्ये होते आणि कंत्राटदार त्याचे करार मिळविण्यासाठी आपआपसात स्पर्धा करायचे.
 
या लोभापायी दिल्लीच्या एका मोठ्या ठेकेदाराने आपल्या मुलाला बाबासाहेबांच्या मुलाकडे म्हणजेच यशवंत राव यांचा कडे पाठविले आणि आपला व्यवसायात भागीदारी आणि बाबासाहेबांमार्फत करार मिळाल्यावर टक्केवारी कमिशन देण्याचा प्रस्ताव दिला. यशवंतराव त्याचा या प्रस्तावास भूलीस पडला आणि त्याचा फसवणुकीत सापडला आणि त्याने आपल्या वडिलांना हा संदेश दिला.
 
बाबासाहेबांना हे ऐकल्यावरच राग आला आणि ते म्हणाले- "मी या पदावर फक्त समाजाच्या उद्धाराच्या उद्देश्याने आहे, माझ्या मुलाला वाढवायला नाही. कोणत्याही प्रकाराचा लोभ मला माझ्या कर्तव्याचे हनन करू देणार नाही".
 
स्रोत: पुस्तक 'युगपुरुष बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर'

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती